केंद्र शासन

केंद्रीय योजना माहीती नोट

जनजाती कार्य मंत्रालय, केंद्र शासन यांच्याकडून आदिवासी विकास विभागास खालील योजनांसाठी केंद्रीय सहाय्य प्रतिवर्ष निधी उपलब्ध करुन देण्यात येतो

  • भारतीय संविधान अनुच्छेद 275 (1) अंतर्गत योजना
  • प्रधान मंत्री आदी आदर्श ग्राम योजना -
  • आदिम जमाती (PVTGs)संरक्षण तथा विकास कार्यक्रम
  • प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान

१) भारतीय संविधान अनुच्छेद 275 (1) अंतर्गत योजना

  • भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275 (1) अंतर्गत राज्य शासनास केंद्र सहाय्य उपलब्ध होते.
  • सदर योजने करीता दि. दि.29 डिसेंबर 2025 रोजी केंद्र शासनाद्वारे नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.
  • सदर योजनेंतर्गत प्राप्त निधीतुन विविध व्यक्तीगत तसेच समुह विकास कार्यक्रम राबविण्यात येत असतात.
  • सन 2018-19 ते 2024-25 या कालावधीकरिता प्राप्त निधीचे विवरणपत्र खालीलप्रमाणे आहे.

( रक्कम लाखात )

Scheme Name Year Received Fund
275 (1) 2018-19 >17015.91
2019-20 23136.7
2020-21 2171.35
2021-22 0
2022-23 0
2023-24 0
2024-25 2401.81
Total   44725.77

2. आदिम जमाती (PVTGs)संरक्षण तथा विकास कार्यक्रम-

केंद्र शासनाने राज्यातील कातकरी,कोलाम व माडीया गोंड या तीन जमाती आदिम जमाती म्हणून घोषीत केलेल्या आहेत.

अ.क्र. जमात जिल्हे
1 कातकरी ठाणे, पालघर, रायगड, पुणे व नाशिक
2 कोलाम यवतमाळ, नांदेड, चंद्रपुर
3 माडीया गोंड गडचिरोली
  • आदिम जमातींच्या सर्वांगीण विकासासाठी आदिम जमाती संरक्षण तथा विकास कार्यक्रमाखाली (CCD Plan) विविध व्यक्तीगत तसेच समुह विकास योजना राबविण्यात येत असतो
  • त्याअनुषंगाने केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करुन केंद्र शासनाने मान्यता प्रदान केलेल्या योजनांची अंमलबजाणी करण्यात येत असते.
  • आदिम जमातीं करीता राज्य योजनेतून देखील निधी उपलब्ध करून देण्यात येत असतो. आदिम जमाती विकास कार्यक्रम याकरिता दि. 17/9/2019 च्या मार्गदर्शक सूचना प्राप्त आहेत.
  • सन 2018-19 ते 2024-25 या कालावधीकरिता प्राप्त निधीचे विवरणपत्र खालीलप्रमाणे आहे.

( रक्कम लाखात )

Scheme Name Year Received Fund
आदिम जमाती विकास कार्यक्रम 2018-19 1230.26
2019-20 2510
2020-21 1411.66
2021-22 0
2022-23 0
2023-24 0
2024-25 0
Total 5151.92

3) प्रधानमंत्री आदी आदर्श ग्राम योजना

  • सन 2021-22 पासुन विशेष केंद्रीय सहाय्य ह्या योजनेएवजी प्रधानमंत्री आदी आदर्श ग्राम योजना राबविण्यात येत आहे.
  • याकरिता केंद्र शासनाने दि. 22.03.2022 रोजी मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत त्यानुषंगाने दिनांक 13.07.2022 रोजी राज्यशासनाने शासन निर्णय निर्गमित केला आहे.
  • सदर योजना सन 2021-22 ते 2025-26 या कालवधीकरिता केंद्र शासनाने निवडलेल्या 3605 गावांमध्ये राबविणे बाबत कार्यवाही सुरु आहे.
  • सन 2020-21 व सन 2021-22 मध्ये 1542 गावांच्या रु. 31425.96 लक्ष किंमतीच्या ग्राम विकास आराखड्यांना केंद्र शासनाकडुन मान्यता मिळाली आहे. या योजेसाठी रक्कम रु.13485.68 इतका निधी प्राप्त झाला आहे.

( रक्कम लाखात )

Scheme Name Year Received Fund
PMAAGY 2021-22 & 2022-23 13485.68

4. प्रधान मंत्री जनजातीय महा न्याय अभियान (PM-JANMAN) –

15 नोव्हेंबर 2023 रोजी “जनजातीय गौरव दिवसा” चे औचित्य साधून माननीय पंतप्रधान महोदयांच्या हस्ते झारखंडमधील खुंटी येथून “पीएम जनमन मिशन” चे अनावरण करण्यात आले. केंद्र शासना मार्फत सन २०२३- २४ च्या अर्थसंकल्पात प्रधान मंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान ( PM JANMAN ) सुरु केले असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आदिम जमातीचे कुटुंबे आणि निवास स्थानांना मुलभूत सोयी सुविधा जसे की, सुरक्षित घरे, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छता, शिक्षणासाठी सुधारित प्रवेश, आरोग्य आणि पोषण, रस्ता आणि दूरसंचार जोडणी आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देणे साठी सदर योजना महत्वाची आहे.

“प्रधान मंत्री जनजातीय महा न्याय अभियाना” ची व्याप्ती

  • जिल्हे-17
  • तालुके-100
  • लोकसंख्या-6.14 लक्ष
  • कुटुंब संख्या-1.45 लक्ष
  • आदिम लोकवस्त्या-3855

मंत्रालय / विभाग निहाय उपक्रम/ योजना

अनु. क्र. मंत्रालय/विभागचे नाव उपक्रम/योजना मंजूरीप्राप्त लक्षांक#
1 ग्रामीणविकास मंत्रालय(MoRD) 1 प्रधानमंत्रीग्रामीणआवासयोजना अंतर्गतपक्कीघरे-(PMAY) 32785 घरकुलांनामंजूरी
2 प्रधानमंत्रीग्रामसडकयोजनाअंतर्गत आदिवासीवस्त्या/वाड्या/पाड्यांना मुख्यरस्त्यासोबतजोडणारेपक्केरस्ते (PMGSY) 27आदिमवस्त्यांचीमुख्यरस्त्यां सोबतजोडणी (50.135किमीरस्त्यांनामंजूरी)
2 आरोग्यआणिकुटुंब कल्याणमंत्रालय (MoHFW) 3 राष्ट्रीयआरोग्यअभियानअंतर्गत मोबाईलमेडिकलयूनिटद्वारेआरोग्य सेवा 79 मोबाईलमेडिकलयूनिट मंजूर
3 जलशक्तीमंत्रालय (MoJS) 4 जलजीवनमिशनअंतर्गतअनुसूचित जमातीच्याकुटुंबीयांनाघरगुतीपाणी पुरवठा 139 पाणीपुरवठायोजनांना मंजूरी 48784 आदिमकुटुंबांना नळजोडणी
4 महिलाआणिबाल विकासमंत्रालय (MoWCD) 5 पोषण अभियान अंतर्गतनवीन अंगणवाड्यांची उभारणी 145 अंगणवाड्यांना मंजूरी
5 शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग (DoSEL) 6 समग्रशिक्षा अभियान अंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची उभारणी 13 वसतिगृहांना मंजूरी (नाशिक-2,गडचिरोली-2, रायगड 6,यवतमाळ 3)
6 दूरसंचार विभाग (DoTelecom) 7 आदिमजातींचा अधिवास असलेल्या गावांमध्ये दूरसंचार जोडणी 9 मोबाईल टॉवर मंजूर
7 ऊर्जामंत्रालय (MoP) 8 अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांसाठी वीजजोडणी 2395 आदिम कुटुंबांना वीज जोडणी
8 नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय(MoNRE) 9 सौरऊर्जेद्वारे अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांसाठी वीजजोडणी (०.३कि. वॅ.सौरग्रिडचीस्थापना) -
9 जनजातीय कार्य मंत्रालय(MoTA) 10 बहूउद्देशीय केंद्रांची स्थापना 119 बहूउद्देशीय केंद्रांना मंजूरी
11 वनधनविकास केंद्रांची स्थापना 40 वनधनविकास केंद्रांना मंजूरी

सदर योजने करिता खालीलप्रमाणे निधी प्राप्त झाला आहे.

Scheme Name Year Received Fund
PM JANMAN 2023-24 190.62
2024-25 1950.01
2024-25 1512.59
850.48
Total   4503.7